Beed Lok sabha Result 2024: बीडमध्ये रोमहर्षक ठरलेल्या लढतीत पंकजा मुंडे यांना पराभवाचा धक्का, बजरंग सोनवणे विजयी

0
96
Beed Lok sabha Result 2024: बीडमध्ये रोमहर्षक ठरलेल्या लढतीत पंकजा मुंडे यांना पराभवाचा धक्का, बजरंग सोनवणे विजयी


२४ व्या फेरी अखेर भाजपाच्या पंकजा मुंडे यांना ३० हजार ४६१ मतांची आघाडी होती. मात्र, २५ व्या फेरीपासून ही आघाडी कमी-कमी होऊ लागली. २५ व्या अखेर २२ हजार ५००, २६ वी फेरी १० हजार २७६ , २७ वी फेरी ७ हजार ४२८ अशी आघाडी कमी होत गेली. तर २८ व्या फेरीत बजरंग सोनवणे यांनी ९३२ मतांची आघाडी घेतली.  त्यानंतर २९ व्या फेरीत १ हजार २१७, ३० वी फेरी २ हजार ६०२ मतांची आघाडी घेतली. मात्र, ३१ व्या फेरीत पुन्हा पारडे फिरले अन् पंकजा मुंडे ४०० मतांनी पुढे आल्या. परंतु, फेरमतमोजणीची मागणी केल्यानंतर झालेल्या मतमोजणीत शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे ७००० मतांनी विजयी झाले आहेत.



Source link