bangladeshi vulture : गळ्यात चिप अन् तब्बल १२१४ किमीचा प्रवास; बांगलादेशी गिधाडामुळे उडाली खळबळ; काय आहे प्रकरण वाचा

0
23
bangladeshi vulture : गळ्यात चिप अन् तब्बल १२१४ किमीचा प्रवास; बांगलादेशी गिधाडामुळे उडाली खळबळ; काय आहे प्रकरण वाचा


bangladeshi vulture : झारखंडच्या हजारीबागमध्ये सापडलेले एक गिधाड सध्या चर्चेचा विषय बनले आहे. विष्णुगड येथील कोनार धरणातून बांगलादेशातील एक गिधाड पकडण्यात आले आहे. त्याच्या पंखावर एक यंत्र असून त्यावर बांगलादेशची राजधानी ढाकाचे नाव आणि क्रमांक कोरलेला आहे. सध्या या गिधाडाला विष्णुगडमध्ये सुरक्षित ठेवण्यात आले आहे. गिधाडाला लावलेली चिप आणि मेटॅलिक रिंगची सध्या तपासणी केली जात आहे. येथील एसपी अरविंद सिंह यांनी सांगितले की, पकडलेल्या गिधाडाची माहिती मिळाली आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. या बाबतचा अहवाल देखील मागवला आहे.



Source link