
bangladesh elections : बांगलादेशमध्ये आज सार्वत्रिक निवडणूक होत आहे. दोन टर्म सत्तेवर राहिलेल्या शेख हसीना पुन्हा बांगलादेशच्या पंतप्रधानपदी विराजमान होतील असा निवडणूक सर्वेक्षण अहवाल आहे. गेल्या अनेक वर्षात शेख हसीना यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेश प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करत आहे. बांगलादेशने २०२२ पासून ७.१ टक्के विकास दराने दक्षिण आशियातील इतर देशांच्या खांद्याला खांदा लावून प्रगती करत आहे. बांगलादेशमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांकडून भारत आणि चीन या दोन्ही देशांना मोठ्या अपेक्षा आहेत. शेख हसीना यांनी पुन्हा एकदा बांगलादेशची धुरा सांभाळावी, अशी दोन्ही देशांची इच्छा आहे कारण शेख हसीना यांनी सत्ता हाती घेतल्यापासून दोन्ही देशांसोबतचे संबंध दृढ ठेवले आहेत.






