
आपल्या विनोदी टायमिंगने रसिकांना खळखळून हसायला लावणारे अभिनेते दिगंबर नाईक सध्या एका बाईमुळे त्रस्त झाले आहेत. या बाईने त्यांना हैराण करून सोडलं आहे.बाई वाड्यातून जा असं ते म्हणतायेत. ही बाई नेमकी कोण? ती वाड्यात का आली आहे? ती बाई वाड्यात राहणार ? की दिगंबर नाईक तिला घालवण्यात यशस्वी होणार का ? हे पाहायचं असेल तर अभिनेते दिगंबर नाईक आणि बिगबॉस फेम सोनाली पाटील यांचे आगमी ‘बाई वाड्यातून जा’ हे धमाल विनोदी नाटक पाहावं लागेल. येत्या बुधवारी २९ मार्चला अत्रे रंगमंदिर कल्याण येथे या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग रंगणार आहे. दिशा आणि कलारंजन प्रस्तुत या नाटकाचे निर्माते उदय साटम, प्रिया पाटील, आबा ढोले यांचे आहे. नाटकाचे लेखन दिग्दर्शन संकेत तांडेल यांचे आहे.






