Badlapur News : बदलापूरच्या रेल्वे प्रवाशांचा मनस्ताप वाढणार; फलाट क्रमांक एक होणार बंद!

0
16
Badlapur News : बदलापूरच्या रेल्वे प्रवाशांचा मनस्ताप वाढणार; फलाट क्रमांक एक होणार बंद!


या ठिकाणी मुंबई तर कर्जत दिशेने १२ मिटरचा बंदिस्त पुल बांधण्यात येणार आहे. हा पूल आधुनिक असणार आहे. या ठिकाणी तिकीट घर, रेल्वे स्टेशन मास्तरचे कार्यालय, शौचालय, खानपाणाचे स्टॉल, प्रतीक्षागृह आदि सुविधा दिले जाणार आहेत. या ठिकाणी प्रवाशांच्या सोईसाठी सरकता जिना देखील बांधण्यात येणार आहे. हा पूल बांधण्यासाठी मोठे पिलर उभारण्यात येत असून हे पिलर एक व दोन नंबरच्या फलाटावर उभारण्यात येणार आहे. मात्र या ठिकाणी जागा कमी असल्याने फक्त कर्जतकडे जाणाऱ्या लोकलसाठी दोन नंबरचा फलाट सुरु ठेवण्यात येणार आहे. सध्याचा एक नंबरचा फलाट कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे.



Source link