Baba Siddique : गावाचा पोशिंदा हरपला! बाबा सिद्दिकींच्या हत्येमुळे मूळ गावावर शोककळा, एकाही घरात पेटली नाही चूल

0
15
Baba Siddique : गावाचा पोशिंदा हरपला! बाबा सिद्दिकींच्या हत्येमुळे मूळ गावावर शोककळा, एकाही घरात पेटली नाही चूल


Baba Siddique Death: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत हत्या झाली. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. त्यांच्या मुंबई येथील मतदार संघाप्रमाणेच त्यांच्या बिहार राज्यातील गोपालगंज देखील शोकसागरात बुडाले आहे. बाबा सिद्दीकी हे मुंबईत राहत असले तरी त्यांची त्यांच्या मूळगावाशी नाळ तुटली नव्हती. त्यांनी त्यांच्या गावात अनेक विकास कामे केली होती. तसेच सामान्य नागरिकांना देखील त्यांनी मोलाची मदत केल्याने त्यांच्या गावी त्यांच्या मृत्यूची वार्ता ऐकून कोणाच्याही घरी चूलही पेटली नाही, अशी माहिती त्यांचे पुतणे गुफरान यांनी दिली.



Source link