
सर्वोच्च न्यायालयाकडून बाबा रामदेव यांना पुन्हा एकदा दणका बसला आहे. पतंजली योग पीठ ट्रस्टला आता सेवा कर भरावा लागणार आहे. पतंजली ट्रस्टच्या वतीने दाखल करण्यात आलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली असून ट्रस्टला लवकरच सेवा कर भरण्याचे आदेशही दिले आहेत.
योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) यांच्या मागच्या अडचणी काही संपताना दिसत नाही आहे. आधीच पंतजलीच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरात प्रकरणात ते अडकले आहेत. या प्रकरणाी अजूनही त्यांना दिलासा मिळाला नाही आहे. आता न्यायालयाने रामदेव यांना आणखी एक झटका दिला असून, सर्वोच्च न्यायालयाने आता पतंजली योगपीठ ट्रस्टला (patanjali yog peeth trust) सेवा कर (service tax) भरण्याचे आदेश दिले आहेत.
हे सुद्धा वाचा
नेमका प्रकार काय?
योगगुरू बाबा रामदेव यांचे देशभरात अनेक फॅालोवर आहेत. ते योगसना द्वारे निरोगी कस राहायचं हे शिकवतात. त्यांच्या पतंजली योगपीठातर्फे देशभरात योग शिबिरे आयोजित केली जातात. आता याच योग शिबिरांसाठी सेवा कर भरण्याचे सेवा कर अपील न्यायाधिकरणाने पतंजली पीठला आदेश दिले होते. या आदेशाला रामदेव यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, इथंही त्यांचा हाती निराशाच आली.









