
हे सगळं सुरू असतानाच आतिषी यांनी भाजपकडून धमकी आल्याचा आरोप केला आहे. ‘भाजपनं एका जवळच्या व्यक्तीच्या माध्यमातून माझ्याशी संपर्क केला आणि भाजप प्रवेशाची ऑफर दिली. राजकीय करिअर वाचवायचं असेल तर भाजपमध्ये या, नाहीतर ईडी येत्या महिन्यात तुम्हाला अटक करेल, असं संबंधित व्यक्तीनं मला सांगितल्याचं आतिशी म्हणाल्या.






