
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज बैठक पार पडली. या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे, शिवसेनेचे अंबादास दानवे आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत अंबादास दानवे म्हणाले की, “ठाकरे गट, शेकाप, सपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या सर्व पक्षांनी बैठक घेऊन घटनाबाह्य सरकारने आयोजित केलेल्या चहापानावर स्वारस्य नसल्याचं आम्ही कळवले आहे. अर्थात आम्ही चहापानावर बहिष्कार घातलेला आहे.




