Assembly Election : विधानसभेसाठी महायुतीचं ठरलं..! ८० टक्के जागावाटप फायनल; भाजप १६० जागा लढवण्याची शक्यता

0
17
Assembly Election : विधानसभेसाठी महायुतीचं ठरलं..! ८० टक्के जागावाटप फायनल; भाजप १६० जागा लढवण्याची शक्यता


राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Vidhansabha Election 2024)वारे वाहत आहे. येत्या १५ दिवसात निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली असून अनेक नेत्यांचे दौरे सुरू झाले आहेत. महायुती व महाविकास आघाडीतच विधानसभेचा थेट सामना होणार आहे. दोन्ही आघाड्यांमध्ये जागावाटपाच्या चर्चा सुरू आहेत. काही जागांवर संघर्षाची स्थिती असल्याचे सांगितले जात असतानाच आता महायुतीत (Mahayuti) जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आल्याची माहिती आहे. महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित झालेल्यी माहिती सूत्रांनी दिली आहे.



Source link