
आशिया कपच्या फायनलमध्ये २९ वर्षीय सिराजने एकाच षटकात ४ विकेट घेतल्या. या सामन्यात त्याने ७ षटकांत २१ धावा देऊन ६ बळी घेतले. सिराजने ५ विकेट घेण्यासाठी केवळ १६ चेंडू घेतले. त्याने चमिंडा वासची बरोबरी केली. २००३ च्या विश्वचषकात श्रीलंकेच्या चामिंडा वासनेही अशी कामगिरी केली होती. सामन्यानंतर मोहम्मद सिराज त्याच्या कामगिरीवर खूप खूश दिसत होता.








