
सुरुवातीला रेणुका यांच्या घरुन त्यांच्या लग्नाला विरोध होता. कारण रेणुकाच्या आईला आशुतोष हा मध्य प्रदेशमधील एका छोट्या गावातून आला आहे, त्यात त्याचे मोठे कुटुंब, रेणुका हे सगळं कसं सांभाळणार असा प्रश्न होता. म्हणून त्यांनी लग्नाला नकार दर्शवला होता. पण रेणुका-आशुतोष यांनी त्यांची समजूत काढली आणि शेवटी त्या लग्नाला तयार झाल्या.








