
निवेदिता यांच्या कुटुंबीयांचा त्यांच्या या नात्याला विरोध होता. आपल्या मुलीने चित्रपट क्षेत्रातील व्यक्तीशी लग्न करू नये अशी निवेदिता यांच्या आईची इच्छा होती. परंतु निवेदिता आपल्या निर्णयावर ठाम होत्या. या सगळ्यात निवेदिता यांची मोठी बहीण डॉ मीनल परांजपे यांनी पुढाकार घेत या लग्नासाठी कुटुंबाकडून परवानगी मिळवली. काही दिवसांनी अशोक सराफ आणि निवेदीता यांनी गोव्यातील मंगेशीच्या देवळात जाऊन विधीवत लग्न केले.







