
Ashok Saraf Award: मराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. नुकताच अशोक सराफ यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मान झाल्यानंतर आता संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराने अशोक सराफ यांचा गौरव होणार आहे. नुकतीच संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.








