
मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर स्वत:चे असे वेगळे स्थान निर्माण करणारे, विनोदी अभिनेते म्हणून अशोक सराफ ओळखले जातात. त्यांची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसते. त्यांनी काही दिवसांपूर्वी ‘अशोक मा. मा’ या मालिकेच्या माध्यमातून मालिका विश्वात कमबॅक केला आहे. या मालिकेचे केवळ तीन भाग प्रसारित झाले असून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता या मालिकेची कथा काय आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.