Asaduddin Owaisi : नरेंद्र मोदी अन् राहुल गांधी म्हणजे ‘राम आणि शाम’ची जोडी, ओवैसींची खोचक टीका

0
18
Asaduddin Owaisi : नरेंद्र मोदी अन् राहुल गांधी म्हणजे ‘राम आणि शाम’ची जोडी, ओवैसींची खोचक टीका


ओवैसी म्हणाले की, बाबरी मशीद पाडण्यामध्ये जितका सहभाग भाजपा व आरएसएसची होती तितकाच सहभाग काँग्रेसचा होता. हे कमलनाथ यांच्या विधानामुळे सिद्ध झाले आहे. भाजपाप्रमाणे काँग्रेसही हिंदुत्वाच्या विचारसरणीवर काम करत आहेत. पुढील वर्षी जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्याही कार्यक्रमात जातील, तेव्हा ते राहुल गांधी यांनाही सोबत घेऊन जातील. ही राजकारणातील राम आणि शामची जोडी आहे. भाजपा आणि आरएसएसची माता काँग्रेस आहे.  काँग्रेस आणि भाजपाच्या हिंदुत्वाच्या अजेंड्यामध्ये कुठलाही फरक नाही आहे, असा घणाघात ओवैसी यांनी केला आहे. 



Source link