
अरविंद केजरीवाल हे जेलमधून आदेश देत असून त्यांनी कामकाजाबाबतचा दुसरा आदेश जारी केला आहे.
दिल्ली : दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री व आपचे नेते अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्या या अटकेनंतर विरोधकांना मोठा धक्का बसला असून यामुळे निवडणूकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. अटक झाल्यानंतरही मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नसल्याचे केजरीवाल यांनी स्पष्ट केले. तसेच अरविंद केजरीवाल हे जेलमधून आदेश देत असून त्यांनी कामकाजाबाबतचा दुसरा आदेश जारी केला आहे.
कोठडीमध्ये असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचे आरोग्यमंत्री सौरभ भारद्वाज यांना काही आदेश दिले आहेत. रुग्णालये आणि मोहल्ला क्लिनिकमध्ये मोफत औषधे मिळत राहतील आणि त्यांच्या वैद्यकीय चाचण्या सुरळीतपणे केल्या जातील याची खात्री करण्यास केजरीवाल यांनी सांगितले आहे. याबाबत स्वतः सौरभ भारद्वाज यांनी माहिती दिली आहे.









