
अरविंद केजरीवाल यांचा जामीन वाढवण्याची याचिकेच्या सुनावणीस नकार देण्यात आला आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांना पुन्हा तुरुंगात जावे लागणार आहे.
दिल्ली : देशभरामध्ये लोकसभा निवडणूकीचे वारे वाहत आहेत. येत्या 1 जून देशातील शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. त्यानंतर 4 जून रोजी लोकसभा निवडणूक 2024 चा निकाल लागणार आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये एनडीए आघाडी विरुद्ध इंडिया आघाडी असे चित्र दिसले. आपचे नेते अरविंद केजरीवाल यांना लोकसभेच्या प्रचारासाठी सुप्रिम कोर्टाकडून अंतरिम जामीन देत प्रचाराची परवानगी दिली होती. इंडिया आघाडीच्या प्रचारासाठी ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट ठरली. त्यानंतर आता अरविंद केजरीवाल यांचा जामीन वाढवण्याची याचिकेच्या सुनावणीस नकार देण्यात आला आहे. सुप्रिम कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना झटका दिला आहे.
याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार









