Arvind Kejriwal | अरविंद केजरीवाल म्हणाले, ‘भाजप जिंकल्यानंतर अमित शाह पंतप्रधान होतील तर मोदी…’ | Navarashtra (नवराष्ट्र)

0
26
Arvind Kejriwal | अरविंद केजरीवाल म्हणाले, ‘भाजप जिंकल्यानंतर अमित शाह पंतप्रधान होतील तर मोदी…’ | Navarashtra (नवराष्ट्र)


arvind kejriwal

दिल्ली मद्य धोरण घोटाळाप्रकरणी जामिनावर सुटताच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपवर सडकून टीका केली. तसेच देशामध्ये ‘इंडिया’ आघाडीचे सरकार बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नवी दिल्ली : दिल्ली मद्य धोरण घोटाळाप्रकरणी जामिनावर सुटताच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपवर सडकून टीका केली. तसेच देशामध्ये ‘इंडिया’ आघाडीचे सरकार बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

केजरीवाल यांनी शनिवारी पत्रपरिषद घेतली. यावेळी केजरीवाल म्हणाले, भाजपचे लोक इंडिया आघाडीला विचारत आहेत की तुमचा पंतप्रधान कोण आहे? परंतु मी सांगतो की, खुद्द मोदी हे पुढचे पंतप्रधान होऊ शकणार नाहीत. ते अमित शाह यांच्यासाठी मते मागत आहेत. पंतप्रधान मोदी पुढच्या वर्षी 17 सप्टेंबर रोजी 75 वर्षांचे होत आहेत.






Source link