
पुढे मुलाखतीमध्ये त्याने लग्नाला २५ वर्षे पूर्ण होत असल्याचे सांगत म्हटले, ‘आमचे केवळ हॅप्पी मॅरिड लाइफ नसून यशस्वी मॅरिड लाइफ आहे. आमच्या आयुष्यातील ही २५ वर्षे अतिशय वेगळी होती. मारीया आणि मी अतिशय वेगळे आहोत. त्यामुळेच कदाचित आम्ही आज एकत्र आहोत. मारीया ही अतिशय तापट आहे आणि मी एकदम शांत. ती सुशिक्षित आहे आणि माझे फारसे शिक्षण झालेले नाही. तिच्या आयुष्यात फार मोजकी व्यक्ती आहेत आणि मी जिकडे जाईल तिकडचा होऊन जातो. या आणि इतर काही गोष्टींमुळेच कदाचित आम्ही आज एकत्र आहोत. तिचा वेडेपण आणि माझा शांत स्वभाव आम्हाला एकमेकांशी बांधून ठेवतो.’







