
बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरने नुकतेच ‘सिंघम अगेन’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान आपण आता सिंगल असल्याची घोषणा केली. अभिनेता मलायका अरोरासोबत बराच काळ रिलेशनशिपमध्ये होता, ज्याची सोशल मीडियावर चर्चा झाली होती. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या जोडीबाबतही गॉसिप सुरू होते आणि चाहते लग्नाची वाट पाहत होते. पण काही दिवसांनंतर दोघांनी ब्रेकअप झाल्याचे सांगितले. ब्रेकअपची पुष्टी झाल्यानंतर अर्जुन कपूरने एका मुलाखतीत सांगितले आहे की, तो अनेकदा मध्यरात्री आपल्या एक्स गर्लफ्रेंडला मेसेज करत असतो.








