
Arbaaz Khan And Shura Khan Wedding: बॉलिवूड अभिनेता अरबाज खान याने पुन्हा एकदा निकाह केला असून, आता या सोहळ्यातीळ दोन सुंदर फोटो शेअर करून त्याने चाहत्यांना आपल्या पत्नीचा चेहरा दाखवला आहे. जॉर्जिया एंड्रियानी हिच्याशी ब्रेकअप झाल्याच्या काहीच दिवसानंतर आता अरबाज खान याने थेट लग्न करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. अरबाज खान याच्या दुसऱ्या पत्नीचे नाव शूरा खान असून, ती बॉलिवूडच्या बड्या सेलिब्रिटींची मेकअप आर्टिस्ट म्हणून नावाजलेली आहे. शूरा खान हिने आतापर्यंत अनेक दिग्गज आणि प्रसिद्ध कलाकारांसोबत काम केले आहे. अरबाज खानने नुकतेच त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.







