Tuesday, August 18, 2026
HomeमनोरंजनAppi Aamchi Collector: अप्पीच्या अर्जुनचं कौतुकास्पद पाऊल; लेकीचा खास दिवस हटके अंदाजात...

Appi Aamchi Collector: अप्पीच्या अर्जुनचं कौतुकास्पद पाऊल; लेकीचा खास दिवस हटके अंदाजात साजरा

Appi Aamchi Collector: अप्पीच्या अर्जुनचं कौतुकास्पद पाऊल; लेकीचा खास दिवस हटके अंदाजात साजरा

[ad_1]

Appi Aamchi Collector Actor Rohit Parshuram:अप्पी आमची कलेक्टर‘ ह्या मालिकेतला इन्स्पेक्टर ‘अर्जुन वर्षा विनायक कदम’ म्हणजेच अभिनेता रोहित परशुराम याच्या घरी चिमुकल्या पाहुणीचे आगमन झाले होते. त्यांच्या घरी आलेल्या या चिमुकल्या परीला म्हणजेच त्याच्या मुलीला, रुईला १०० दिवस पूर्ण झाले आहेत. या निमित्ताने रोहितने एक छान छोटासा कार्यक्रम शाळेत साजरा केला. आजगाव मधील जिल्हापरिषद प्राथमिक शाळेत जाऊन रोहितने मुलांना परीक्षेसाठी आणि लेखनासाठी पॅड भेट दिले. रोहितने सगळ्यांनाच प्रेरणा देणाऱ्या, वेगवेगळ्या क्षेत्रात इतिहास घडवणाऱ्या स्त्रिया म्हणजे राणी लक्ष्मीबाई, जिजामाता, इंदिरा गांधी, प्रियांका चोप्रा, सायना नेहवाल आणि गीता फोगट यांचे फोटो आणि नुकताच यशस्वी झालेला चंद्रयानाचा ऐतिहासिक क्षण लक्षात राहावा, म्हणून त्याचेही फोटो स्टिकर या पॅडवर लावले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments