Anupam- Kirron kher: पहिलं लग्न मोडल्यानंतर मिळाला एकमेकांचा आधार! किरण-अनुपम खेर यांची फिल्मी लव्हस्टोरी!

0
13
Anupam- Kirron kher: पहिलं लग्न मोडल्यानंतर मिळाला एकमेकांचा आधार! किरण-अनुपम खेर यांची फिल्मी लव्हस्टोरी!


अनुपम खेर आणि किरण खेर सुरुवातीला एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. किरण खेर चंदिगडमध्ये ज्या थिएटर ग्रुपशी संबंधित होत्या, त्याच थिएटर ग्रुपमध्ये अनुपम खेर देखील होते. त्यावेळी किरण खेर या प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. तर, अनुपम हे संघर्ष करत होते. दोघांनी अनेक नाटकांमध्ये एकत्र काम केले. मात्र, दोघांचे आधीच लग्न झालेले होते. अनुपम खेर यांनी १९७९मध्ये अरेंज मॅरेज केले होते, पण ते या नात्यातून काहीच वर्षात वेगळे झाले होते. तर, किरण यांचे लग्न १९८०मध्ये मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती गौतम बेरी यांच्याशी झाले होते. मात्र, त्यांचा संसार अवघा पाच वर्षेच टिकला.



Source link