
छोट्या पडद्यावरील म्यूजिकल शो ‘अंताक्षरी’ सर्वांच्या आजही लक्षात आहे. हा शो अभिनेते अन्नू कपूर यांनी होस्ट केला आहे. आजही अंताक्षरीचे नाव घेतले की अन्नू कपूरचा चेहरा सर्वांच्या समोर उभा राहातो. त्यांनी ‘काला पत्थर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. काला पत्थप या पहिल्यावहिल्या चित्रपटातून अन्नू कपूरने स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली. त्यानंतर त्यांनी ‘बेताब’, ‘मंडी’, ‘आधारशिला’ आणि ‘खंडर”मिस्टर इंडिया’, ‘तेजाब’, ‘राम लखन’, ‘घायल’, ‘हम’, ‘डर’ यांसारख्या यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले. आज २० फेब्रुवारी रोजी अन्नू कपूर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या विषयी काही खास गोष्टी….







