
संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित ‘अॅनिमल’मध्ये अनिल कपूर, बॉबी देओल आणि रश्मिका मंदाना यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. ‘अॅनिमल’, ‘गदर २’ आणि ‘ओह माय गॉड २’ यांच्यातील बॉक्स ऑफिस टक्करमध्ये कोणाचे जास्त नुकसान होणार, यावर जोरदार चर्चा रंगली होती. चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी शनिवारी ट्विटरवर हे अपडेट शेअर केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, ‘अभिनेता रणबीर कपूर आणि दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांचा ‘अॅनिमल’ हा चित्रपट आता ११ ऑगस्टला प्रदर्शित होणार नाही. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत नवीन रिलीजची तारीख जाहीर केली जाईल.’








