
फलटण प्रतिनिधी उमेश काकडे :- दावोस (स्वित्झर्लंड) येथे आयोजित World Economic Forum 2026 मध्ये माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली सहभागी होण्याचा अनुभव अत्यंत प्रेरणादायी आणि अभिमानास्पद ठरला आहे. जागतिक आर्थिक, औद्योगिक आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या आंतरराष्ट्रीय मंचावर भारताचे, तसेच महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे ही निश्चितच गौरवाची बाब आहे.
फलटण सारख्या तालुक्याचा शहरातून सागर अहिवळे यांच्या सुरू झालेला हा प्रवास आज दावोससारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठापर्यंत येऊन पोहोचला आहे. लहानशा गावात मोठी स्वप्ने उराशी बाळगून, सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द आणि सकारात्मक दृष्टिकोनाच्या बळावर हा टप्पा गाठता आला, याचा मनापासून अभिमान वाटतो. ग्रामीण भागातून पुढे येत जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणे ही अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी बाब ठरेल.
या संपूर्ण प्रवासात आलेल्या प्रत्येक उतार-चढावाच्या टप्प्यावर ज्यांनी विश्वास ठेवला, मार्गदर्शन केले, सहकार्य आणि प्रोत्साहन दिले—त्या सर्वांचा मी मनःपूर्वक ऋणी आणि आभारी आहे. त्यांच्या पाठिंब्याशिवाय हा प्रवास शक्य झाला नसता.
एक संस्था म्हणून आम्ही भारताच्या Net Zero ध्येयाशी पूर्णतः जोडलेलो असून, शाश्वत विकास, जबाबदार नवकल्पना आणि पर्यावरणासाठी मोजता येईल असा सकारात्मक बदल घडवण्यासाठी सातत्याने काम करत आहोत. दावोस येथील चर्चांमधून जागतिक स्तरावरील सर्वोत्तम पद्धती, धोरणात्मक दृष्टीकोन आणि सहकार्याच्या नव्या संधी समोर आल्या असून, त्यांचा लाभ भारताच्या शाश्वत प्रगतीसाठी घेण्याचा आमचा संकल्प अधिक दृढ झाला आहे.








