
Amvaravti Daryapur Congress MLA Car Accident : अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार बळवंत वानखडे यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. आमदार बळवंत वानखडे यांची गाडी ट्रॅक्टरला धडकली असून ट्रॅक्टरमधून कापूस वेचून घरी जात असणाऱ्या एका शेतमजूराचा या घटनेत मृत्यू झाला आहे. तर दोघे जण जखमी झाले आहेत.


