Amitabh Bachchan: जय श्रीराम! अमिताभ बच्चन पोहोचले अयोध्येत

0
22
Amitabh Bachchan: जय श्रीराम! अमिताभ बच्चन पोहोचले अयोध्येत


दर्शन घेतल्यानंतर अमिताभ बच्चन हे थेट अयोध्याचे मंडल कमिश्नर गौरव दयाल यांच्या घरी पोहचले. विशेष म्हणजे गौरव दयाल यांच्या घरी अजूनही काही अधिकारी आणि त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते. यावेळी अमिताभ बच्चन हे खास संवाद साधताना दिसले. यावेळी जय श्रीरामच्या घोषणा देताना अमिताभ बच्चन हे दिसले. “आता अयोध्येला नेहमीच येणे जाणे सुरू असेल माझे. मला बरेच लोक मी जिथे जाईल तिथे म्हणतात की, मुंबईला राहतात. इथे येणे जाणे होणार नाही. माझा जन्म हा अलाहाबादमध्ये झाला आहे आणि आम्ही त्यानंतर दिल्ली, कोलकाता मुंबईमध्ये राहिलो. कोलकाता, दिल्ली आणि मुंबईत राहिलो हे खरे पण कुठेही गेले तरीही ‘छोरा गंगा किनारे वाला’च म्हटले जाते” असे अमिताभ बच्चन म्हणाले.



Source link