Amit Bhanushali: ‘ठरलं तर मग’ अभिनेत्याच्या नावावर पैसे उकळण्याचा प्रकार; पोस्ट लिहित अमित भानुशाली म्हणाला…

0
23
Amit Bhanushali: ‘ठरलं तर मग’ अभिनेत्याच्या नावावर पैसे उकळण्याचा प्रकार; पोस्ट लिहित अमित भानुशाली म्हणाला…


सोशल मीडियाच्या आणि इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन स्कॅम होण्याचे प्रकार सध्या वाढत चालले आहेत. सर्वसामान्य लोकांना निशाणा बनवत असे लोक सगळ्यांना लुटत आहेत. असाच काहीसा प्रकार अभिनेता अमित भानुशाली याच्यासोबत घडला आहे. या प्रकारामुळे स्वतः अभिनेत्याला मोठा धक्का बसला असून, त्याने आपल्या चाहत्यांना देखील सावध केले आहे. या संदर्भात त्याने एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने या स्कॅम करणाऱ्या एका प्रकरणाचा स्क्रीन शॉट शेअर केला आहे. या मध्ये अमित भानुशाली याच्या नावाने एक अकाऊंट सुरू करून, त्याद्वारे कुणाच्या तरी मदतीसाठी पैसे जमा करायचे असल्याचे म्हणत, सगळ्यांकडून पैशांची मागणी केली आहे.



Source link