Monday, September 14, 2026
Homeमहाराष्ट्रamazon online fraud : मुंबईतील एकाने ऑनलाईन मागवला तब्बल ५५ हजारांचा फोन;...

amazon online fraud : मुंबईतील एकाने ऑनलाईन मागवला तब्बल ५५ हजारांचा फोन; मात्र, मिळाले अर्धा डझन चहाचे कप

[ad_1]

नागरीक संचालित बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) कंपनीतील उप अभियंता असलेले अमर चव्हाण यांनी १३ जुलै रोजी ॲमेझाॅनवरून टेक्नो फँटम व्ही फोल्ड मोबाईल फोन मागवला होता. या साठी त्यांनी तब्बल ५४,९९९ रुपये ऑनलाइन भरले. ऑर्डर केलेल्या दोन दिवसानंतर त्यांच्या घरी पार्सल आले. त्यांनी हे पार्सल उघडल्यावर त्यांना फोन ऐवजी चहाचे कप आल्याने त्यांना धक्काच बसला. या प्रकरणी त्यांनी ॲमेझॉन तसेच विक्रेत्या कंपनीशी संपर्क साधून तक्रार केली. मात्र, त्यांना कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. अखेर वैतागून चव्हाण यांनी ॲमेझॉन आणि पार्सल देणाऱ्या कंपनी विरोधात फसवणूक केल्याप्रकरणी माहीम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणी पोलिस चौकशी सुरू आहे, असे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणी Amazon India ने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments