Amazon Employee | अ‍ॅमेझॉनच्या कर्मचाऱ्यांनो, ‘तातडीने कार्यालयात हजर व्हा, अन्यथा…’; कंपनीने दिला ‘हा’ इशारा | Navarashtra (नवराष्ट्र)

0
16
Amazon Employee | अ‍ॅमेझॉनच्या कर्मचाऱ्यांनो, ‘तातडीने कार्यालयात हजर व्हा, अन्यथा…’; कंपनीने दिला ‘हा’ इशारा | Navarashtra (नवराष्ट्र)


Amazon-2

जगातील आघाडीची ई-कॉमर्स कंपनी ऍमेझॉनने (Amazon) आपल्या ‘वर्क फ्रॉम ऑफिस’ (Work from Office) धोरणाबाबत कठोर भूमिका घेत आहे. जे कर्मचारी कार्यालयात परतण्याच्या आदेशाचे पालन करत नाहीत. त्यांना व्यवस्थापकांनी काढून टाकावे. ऍमेझॉनने रिटर्न-टू-ऑफिस (Return to Office) धोरणाची अंमलबजावणी सुरू केली आहे.

मुंबई : जगातील आघाडीची ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनने (Amazon) आपल्या ‘वर्क फ्रॉम ऑफिस’ (Work from Office) धोरणाबाबत कठोर भूमिका घेत आहे. जे कर्मचारी कार्यालयात परतण्याच्या आदेशाचे पालन करत नाहीत. त्यांना व्यवस्थापकांनी काढून टाकावे. अ‍ॅमेझॉनने रिटर्न-टू-ऑफिस (Return to Office) धोरणाची अंमलबजावणी सुरू केली आहे. अशा परिस्थितीत कंपनी या धोरणाचे पालन न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करू शकते.

अ‍ॅमेझॉनच्या ऑफिस टू रिटर्न पॉलिसीनुसार, आता सर्व कर्मचाऱ्यांना आठवड्यातून किमान तीन दिवस कार्यालयात येणे बंधनकारक झाले आहे. एखाद्या कर्मचाऱ्याने हा नियम पाळला नाही. तर कंपनी मॅनेजर त्याच्यावर कारवाई करू शकतो. कंपनीने अंतर्गत पोर्टलवर कर्मचाऱ्यांना याची माहितीही दिली आहे. अ‍ॅमेझॉनने आपल्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून तीन दिवस कार्यालयात येण्यास सांगितले आहे. परंतु, जे या नियमाचे पालन करत नाहीत, त्यांना तीन टप्प्यातील योजनेचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत.






Source link