
गेल्या अनेक महिन्यांपासून ‘रामायण’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याची तगडीड स्टारकास्ट. रणबीर आणि आलिया या चित्रपटात ‘राम’ आणि ‘सीते’च्या भूमिकेत, तर दाक्षिणात्य अभिनेता यश ‘रावणा’च्या भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले गेले होते. पण, आता आलिया भट्टने या चित्रपटाला अलविदा म्हटलं आहे. आता आलिया ‘रामायण’ चित्रपटात सीतेची भूमिका साकारणार नाहीये. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि केजीएफ स्टार यश दिसणार होते. जुलैच्या अखेरीस फिल्मसिटीमध्ये शूट करण्याचे नियोजन देखील करण्यात आले होते. मात्र, आता सगळेच नियोजन रखडणार आहे.







