
आलियाने स्टोरीला फोटो शेअर करत, ‘ही काय मस्करी आहे? मी दुपारी माझ्या लिविंग एरिअयामध्ये आराम करत बसली होती. तेव्हा मला असे वाटले की मला कोणी तरी पाहात आहे. जेव्हा मी वर पाहिले तेव्हा दोन व्यक्ती शेजारच्या बिल्डींगवरुन माझे फोटो काढत होते. हे कोणते विश्व आहे जिथे हे सर्व चालतय आणि याची परवानगी आहे? हे एखाद्या खासगी आयुष्यात डोकावण्यासारखे आहे. एक रेषा असते, जी पार केली जाऊ शकत नाही. मात्र तुम्ही सर्व मर्यादा तोडल्या आहेत’ या अशयाचे कॅप्शन दिले आहे.