
‘राउडी राठौर २’ या चित्रपटासाठी अक्षय कुमारऐवजी अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याला विचारणा झाली आहे. बॉलिवूडचा हँडसम हंक अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा लग्नानंतर कामावर परतला आहे. सध्या सिद्धार्थकडे अनेक मोठे चित्रपट आहेत. तर, दुसरीकडे बॉलिवूड इंडस्ट्रीत अनेक सुपरहिट चित्रपटांचे दुसरे भाग येणार आहेत. दरम्यान, ‘राउडी राठौर’ या चित्रपटाचा सिक्वेल बनवण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली असून, या सिक्वेलमध्ये सिद्धार्थ मल्होत्राला कास्ट करणार असल्याची चर्चा रंगली आहे.







