Akshardham Temple America | 12 वर्षाच्या बांधकामानंतर अमेरिकेत उभं राहिलं सर्वात मोठं हिंदू मंदिर! 185 एकरात पसरलेलं अक्षरधाम मंदिर भाविकांसाठी खुलं! | Navarashtra (नवराष्ट्र)

0
69
Akshardham Temple America | 12 वर्षाच्या बांधकामानंतर अमेरिकेत उभं राहिलं सर्वात मोठं हिंदू मंदिर! 185 एकरात पसरलेलं अक्षरधाम मंदिर भाविकांसाठी खुलं! | Navarashtra (नवराष्ट्र)


12 वर्षाच्या बांधकामानंतर अमेरिकेत उभं राहिलं सर्वात मोठं हिंदू मंदिर! 185 एकरात पसरलेलं अक्षरधाम मंदिर भाविकांसाठी खुलं!

अमेरिकेतील न्यू जर्सी येथील अक्षरधाम (Akshardham Temple America) या सर्वात मोठ्या हिंदू मंदिराचे उद्घाटन करण्यात आले आहे. हे मंदिर 185 एकरावर बांधले आहे. मंदिर पूर्ण होण्यासाठी 12 वर्षे लागली आणि मंदिराच्या बांधकामात 12,500 लोकांनी योगदान दिले आहे. स्वयंसेवकांनी रात्रंदिवस काम केले. मंदिरात वापरलेले दगड २९ देशांतून आणले आहेत. हा भारतीय संस्कृती, कला आणि अध्यात्म यांचा संगम असल्याचे बोलले जात आहे.

हे सुद्धा वाचा

 185 एकरात पसरलं आहे मंदिर

अमेरिकेतील सर्वात मोठे हिंदू मंदिर BAPS स्वामीनारायण अक्षरधामचे उद्घाटन करण्यात आले आहे. 185 एकरात पसरलेले हे मंदिर आता भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. हे मंदिर अमेरिकेत आणि जगभरातील लोकांना एकता, शांतता आणि सौहार्दाचा संदेश देते. भगवान स्वामीनारायण यांना समर्पित मंदिराचे बांधकाम 2011 मध्ये सुरू झाले आणि या वर्षी पूर्ण झाले. हे जगभरातील 12,500 स्वयंसेवकांनी तयार केले आहे. मंदिराची अनेक प्रमुख वैशिष्ठ्ये आहेत. यापैकी एक दगडापासून बांधलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा घुमट आहे.






Source link