Akola Cylinder Blast : गॅस सिलिंडर लीक झाल्याने मोठा स्फोट, होरपळलेल्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

0
21
Akola Cylinder Blast : गॅस सिलिंडर लीक झाल्याने मोठा स्फोट, होरपळलेल्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू


गॅस सिलिंडरचा स्फोट झाला, त्यावेळी प्रियांकाचे आई-वडील कामानिमित्त बाहेर गेलेले होते. घरात कुणीच नसल्याने वेळीच कुणीही मदतीला आलं नाही, परिणामी प्रियांका मोठ्या प्रमाणात होरपळली. घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करण्यात आला असून पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात झालेल्या गॅस सिलिंडर स्फोटामुळं राज्यात खळबळ उडाली आहे. त्यातच आता अकोल्यातही गॅस सिलिंडर स्फोटाच्या घटनेत एका तरुणीचा मृत्यू झाल्याने शोक व्यक्त केला जात आहे.



Source link