अकलूज : मुस्लिम बांधवांकडून नवनिर्वाचित नगरसेवकांचा हृदयस्पर्शी सत्कार

0
17
अकलूज : मुस्लिम बांधवांकडून नवनिर्वाचित नगरसेवकांचा हृदयस्पर्शी सत्कार

अकलूज : दि. १६ जानेवारी २०२६ रोजी बागवान गल्ली, आझाद चौक, अकलूज येथे मुस्लिम बांधवांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभात नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविकांचा अत्यंत उत्साहात आणि आपुलकीच्या वातावरणात सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात अकलूज नगरपरिषदेचे गटनेते तथा उपनगराध्यक्ष आदरणीय श्री. शिवतेजसिंह (बाबा) मोहिते-पाटील, नगरसेवक आदरणीय श्री. सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्यासह सर्व प्रभागांतील नगरसेवक व नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अकलूज शहर बागवान समाज, भैया माढेकर मित्र परिवार तसेच बागवान गल्लीतील सर्व मित्र मंडळांनी एकत्र येऊन हा सत्कार समारंभ यशस्वीपणे पार पाडला. मुस्लिम समाजातील बांधवांनी व्यक्त केलेले प्रेम, आपुलकी आणि विश्वास नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींसाठी प्रेरणादायी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
विकासाच्या प्रक्रियेत समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन पुढे जाणे, हे मोहिते-पाटील परिवाराचे संस्कार असून बागवान गल्ली व परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तसेच या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले. हा सत्कार समारंभ सामाजिक सलोखा आणि एकतेचे उत्तम उदाहरण ठरला.