
फलटण (प्रतिनिधी) : माळशिरस तालुक्यातील तांबवे गावातील कालकथित (अक्कासाहेब )मंगल बाळासाहेब भोसले यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त एक भावपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
‘मंगल विहार, मु.पो. तांबवे, ता. माळशिरस, जि. सोलापूर’ येथे दि. २७ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमात अक्कासाहेब यांच्या कार्य, विचार आणि दिलेल्या योगदानाचे स्मरण करण्यात येणार आहे.
अक्कासाहेब यांचे अनमोल मार्गदर्शन, विचारशीलता आणि प्रेमळ आशीर्वाद यांचे स्मरण करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यांच्या स्मृतींच्या गंधानी संपूर्ण आसमंत भारून गेला आहे, आणि त्यांच्या विचारांचे प्रेरणादायी मार्गदर्शन आजही कुटुंबाला दिशा देत आहे.
“हवी होतीस आम्हाला, आशीर्वाद अक्का देताना,
अनमोल असे मार्गदर्शन जीवनात आमच्या करताना.
अक्का तुझ्या स्मृतीगंधानी आसमंत दखळला साग,
तुझी सम्यक दृष्टी, वाणी, विचारांचा वाहतोय झुळझुळ वारा.”
“न थकता, न हारता चंदनासम झिजली,
ऊच्च आचार-विचार दिशा जगण्याची दिली.
खूप उणीव भासते आयुष्य हे जगताना,
यावे परतूनी अक्का — खूप होतात यातना…”
अक्कासाहेब यांनी समाजात आदर्शवत जीवन जगत अनेकांना प्रेरणा दिली. त्यांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी आयोजित या द्वितीय पुण्यस्मरण कार्यक्रमाला सर्व ग्रामस्थ, नातेवाईक, आणि अनुयायी यांची उपस्थित प्रार्थनीय आहे
स्थळ: मंगल विहार, मु.पो. तांबवे, ता. माळशिरस, जि. सोलापूर
दिनांक: २७ ऑक्टोबर २०२५
वेळ: सकाळी १०:३०
साहस टाइम्सतर्फे अक्कासाहेबांना विनम्र अभिवादन








