Ajit Pawar : शरद पवारांबरोबर पुन्हा जाणार का? अजित पवारांनी दोन शब्दांत उत्तर देत सस्पेन्स वाढवला; म्हणाले…

0
16
Ajit Pawar : शरद पवारांबरोबर पुन्हा जाणार का?  अजित पवारांनी दोन शब्दांत उत्तर देत सस्पेन्स वाढवला; म्हणाले…


Ajit Pawar On Sharad Pawar : सुमारे एक वर्षापूर्वी म्हणजे २ जुलै २०२३ रोजी फूट पडली. राष्ट्रवादीत उभी फूट पडून अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह सत्ताधारी गटात सामील झाले. त्यानंतर लोकसभेतील अपयशानंतर अजित पवारांनी विधानसभेची तयारी सुरू करत महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून आढावा बैठका आणि सभा घेत आगामी निवडणुकीसंदर्भात उमेदवारांची आणि मतदारसंघाची चाचपणी सुरु आहे. त्यात दोन दिवसापूर्वी अजित पवारांनी म्हटलं होतं की, ‘सुनेत्रा पवार यांना बारामतीमधून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवणं आपली चूक होती. अजित पवारांच्या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत.



Source link