
Aishwarya Rai-Abhishek Bachchan: बॉलिवूडची आदर्श जोडी मानली जाणारी ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्यात आता दुरावा आल्याचे बोलले जात आहे. एकीकडे घटस्फोटाच्या चर्चा सुरू असतानाच आता ऐश्वर्या राय हिने बच्चन कुटुंबाचं राहतं घर सोडल्याचे म्हटले जात आहे. ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याचं घर सोडलं असून, ती आपल्या आईसोबत राहायला गेल्याचे समोर आले आहे. अद्याप या वृत्तावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मागील काही दिवसांपासून बच्चन कुटुंबातील वाद मीडियासमोर येताना दिसत आहेत. कधी अभिषेक आणि ऐश्वर्या वेगळे झाल्याच्या बातम्या येत होत्या, तर कधी अमिताभ बच्चन यांनी आपल्या सुनेला सोशल मीडियावरून अनफॉलो केल्याचे म्हटले जात होते.








