
सलग सुट्ट्यांमळे राज्यातील सर्व पर्यटनस्थळे लोकांच्या गर्दीने फुलली आहेत. पिकनिकच्या ठिकाणी अतिउत्साही पर्यटकांमुळे अपघाताच्या घटना घडत असतात. अशीच एक दु:खद घटना अहमदनगर जिल्ह्यातून समोर आली आहे. सांदण दरी पाहण्यासाठी आलेल्या एका पर्यटक तरुणीचा मृत्यू दरीत कोसळून मृत्यू झाला आहे. ऐश्वर्या खानविलकर (२४ वर्षे) असं या मृत तरुणीचं नाव आहे.


