Ahmednagar : विहिरीत पडलेल्या मांजरीला वाचवण्याच्या प्रयत्नात कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू, अहमदनगर येथील घटना

0
22
Ahmednagar : विहिरीत पडलेल्या मांजरीला वाचवण्याच्या प्रयत्नात कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू, अहमदनगर येथील घटना


मिळालेल्या माहितीनुसार, विहिरीत मांजर अडकल्याचे संबंधित कुटुंबाच्या लक्षात येताच त्यांनी मांजरीला बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. मांजरीला वाचवण्यासाठी एकामागोमाग एक कुटुंबातील सहा सदस्यांनी विहिरीत उडी घेतली. मात्र परिस्थिती त्यांच्या नियंत्रणाबाहेर गेली. यातील एका जणाने मदतीसाठी हाक मारली, त्यावेळी विहिरीच्या बाजूने जात असलेल्या गावकऱ्याने ऐकल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर काही वेळातच बचाव पथक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कुटुंबातील एका सदस्याला वाचवण्यात आले असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर, ५ जणांचा मृत्यू झाला.



Source link