
आरक्षणाबाबत सैनी म्हणाले, ‘गट क मधील नागरी पदांच्या सरळ भरतीत अग्निवीरांना ५ टक्के आरक्षण आणि ब गटात १ टक्के जागा राखीव ठेवण्यात येणार आहे. तसेच राज्य सरकारकडून भरती केल्या जाणाऱ्या कॉन्स्टेबल, मायनिंग गार्ड, फॉरेस्ट गार्ड, जेल वॉर्डन आणि एसपीओ या पदांच्या सरळ भरतीत १० टक्के आडवे आरक्षण देण्यात येणार आहे. व्यवसायासाठी ५ लाखांचे बिनव्याजी कर्ज दिले जाणार आहे.