
एकेकाळी बॉलिवूड गाजवणारा लोकप्रिय अभिनेता साहिल खानला ‘महादेव बेटिंग ॲप’ प्रकरणी छत्तीसगढ येथून अटक करण्यात आली. या प्रकरणात हाय कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर साहिल खान हा फरार झाला होता. शेवटी आज एसआयटीच्या पथकाने त्याला छत्तीसगडमध्ये अटक केली. आता या प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. साहिल खानला १ मे पर्यंत पोलीस कोठडीत रहावे लागणार आहे.








