
कलर्स मराठी वाहिनीवरील ‘अबीर गुलाल’ ही प्रेक्षकांची प्रचंड आवडती मालिका आहे. मालिकेत निरनिराळे ट्विस्ट येत आहेत. त्यामुळेच ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते आहे. आता या मालिकेत नाट्यमय वळण आले आहे. शुभ्रा आणि अगस्त्यचा थाटामाटात साखरपुडा पार पडणार आहे. अगस्त्यसोबत नव्या आयुष्याची सुरुवात करण्यास शुभ्रा आता सज्ज आहे. श्रीने आतापर्यंत अगस्त्यकडे आपल्या प्रेमाची कबुली दिलेली नाही. त्यामुळे शुभ्रा आणि अगस्त्यचा साखरपुडा होताना पाहून तिला मोठा धक्का बसणार आहे.







