
काही दिवसांपूर्वी सुंबुल तौकीर खान, शिव ठाकरे आणि अब्दू रोजिक नुकतेच एका कार्यक्रमादरम्यान एकत्र दिसले होते. यादरम्यान, मीडियाला मुलाखत देताना, अब्दू यांनी आता ‘मंडली गँग’ची मैत्री संपल्याची पुष्टी केली होती. इतकेच नाही, तर त्याने यामागचे कारणही सांगितले होते. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की, एमसी स्टॅन आणि अब्दू रोजिक एक गाणे रेकॉर्ड करणार होते. मात्र, या गाण्यावरून दोघांमध्ये वाद झाला होता. गाणे रेकॉर्ड न होऊ शकल्याने अब्दू एमसी स्टेनवर नाराज झाला असल्याचे बोलले गेले होते.








