
AamRas Best Mango Dish in Marathi: काही लोकांसाठी उन्हाळा म्हणजे आंब्याचा हंगाम. त्यातच आमरस हा आपल्या सगळ्यांचाच अगदी आवडीचा पदार्थ आहे. आमरस खाल्ल्याशिवाय आपल्यालाही चैन पडत नाही खासकरून आंब्यांचा सिझन असतो तेव्हा. तुम्ही जर आंबाप्रेंमी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.
उन्हाळा सुरु झाला की सर्वांना कधी एकदा गोड रसाळ आंबा खायला मिळतोय याची आतुरतेने लोक वाट पाहत असतात. आंब्यापासून अनेक पदार्थ देखील बनवले जातात, जे इतके स्वादिष्ट असतात जे खाल्ल्यानंतर लोक स्वत:चे बोटे चाटतात. त्यातच आमर हा आपल्या सगळ्यांचाच अगदी आवडीचा पदार्थ आहे. आमरस खाल्ल्याशिवाय आपल्यालाही चैन पडत नाही. आता या आमरसला जगात अव्वल स्थान प्राप्त झाले.
टेस्ट अॅटलासच्या फूड गाईडतर्फे दिलेल्या गेलेल्या क्रमांकानुसार आंब्यापासून तयार केल्या जाणाऱ्या 10 पदार्थांमध्ये आमरस नंबर वन पदार्थ ठरला आहे. या यादीत त्याला पहिला क्रमांक मिळाला आहे. यात आंब्यापासून तयार केलेल्या मराठमोळ्या चटणीचाही समावेश आहे. आमरस हा पदार्थ महाराष्ट्रापासून संपूर्ण देशात तसेच जगात प्रसिद्ध आहे. जिथे जिथे भारतीय नागरिक वास्तव्यास आहेत तिथे आमरस अगदी चवीने खाल्ला जातो. त्यातून आता हा आमरस जगात अव्वल ठरला आहे.









