Aam Aadmi Party | ‘आप’ घोटाळ्यांचा जनक, कंठापर्यंत भ्रष्टाचारात बुडाला; हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांची टीका | Navarashtra (नवराष्ट्र)

0
19
Aam Aadmi Party | ‘आप’ घोटाळ्यांचा जनक, कंठापर्यंत भ्रष्टाचारात बुडाला; हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांची टीका | Navarashtra (नवराष्ट्र)


anil vij

‘आप’ हा घोटाळ्याचा जनक पक्ष आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देण्याचा नारा देत हा पक्ष सत्तेवर आला. पण आता तोच भ्रष्टाचाराच्या गर्तेत आहे. कोणत्याही पक्षाचे बडे नेते भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सातत्याने तुरुंगात जात असतील, तर हा पक्ष कोणते ध्येय घेऊन सत्तेत आला आहे, याचा विचार जनतेने करायला हवा’, असे आवाहन हरियाणाचे गृह आणि आरोग्यमंत्री अनिल विज (Anil Vij) यांनी केले.

चंदीगड : ‘आप’ हा घोटाळ्याचा जनक पक्ष आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देण्याचा नारा देत हा पक्ष सत्तेवर आला. पण आता तोच भ्रष्टाचाराच्या गर्तेत आहे. कोणत्याही पक्षाचे बडे नेते भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सातत्याने तुरुंगात जात असतील, तर हा पक्ष कोणते ध्येय घेऊन सत्तेत आला आहे, याचा विचार जनतेने करायला हवा’, असे आवाहन हरियाणाचे गृह आणि आरोग्यमंत्री अनिल विज (Anil Vij) यांनी केले.

आम आदमी पक्षाच्या मंत्र्यांना सतत तुरुंगात टाकल्याचा खरपूस समाचार अनिल विज यांनी घेतला. ते म्हणाले, ‘आप’ सतत आरोप करत आहे की, त्यांच्या नेत्यांना जबरदस्तीने तुरुंगात टाकले जात आहे. पण, कोर्टात तुम्हाला रिमांड का देण्यात आला? गत 7-8 महिन्यांपासून कोर्ट तुमचा जामीन अर्ज फेटाळत आहे, तुमचा देशातील कोणत्याही यंत्रणेवर विश्वास नाही का ? न्यायालय चुकीचे आहे आणि न्यायालय तुम्हाला छळत आहे, असे म्हणणे हा न्यायालयाचा अवमान आहे.






Source link