
वीणा लगेच पेन घेते आणि त्यावर सही करण्यास तयार होते. तेवढ्यात अनिरुद्ध तिला थांबवतो आणि म्हणतो, ‘कितीही जवळचं नातं असतलं तरीही न वाचता घेतलेले निर्णय चांगले नसतात.’ ते ऐकून आशुतोष आणि वीणाला धक्का बसतो. वीणा पेपर अनिरुद्धकडे देते. तेवढ्यात अरुंधती वीणाला म्हणते की, ‘जर पेपर तू वाचणार आहेस तर ते तुझ्याकडेच राहू दे.’ ते ऐकून अनिरुद्ध चकीत होतो.








